PMC : पुणे महापालिकेचा तब्बल ९ हजार ५१५ कोटींचा अर्थसंकल्प, वाचा अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे



ब्युरो टीम : पुणे महापालिकेचा प्रशासकीय अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. २०२३-२४ वार्षिक अर्थसंकल्प पुणे महानगरपालिकेचे आयुक्त (प्रशासक) यांनी सादर केला आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी ९५१५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या बजेटमध्ये 923 कोटींची भर करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद 1321 कोटी पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पगार आणि पेन्शनवर सुमारे 3100 कोटी खर्च होणार आहे.

पुण्याच्या अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे :

-पुण्यातील रस्त्यासाठी ९९२ कोटी रुपयांची तरतूद

- पी एम पी एल साठी ४५९ कोटी रुपयांची तरतूद

- पुणे शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी ४६८ कोटी रुपये

- आरोग्यासाठी ५०५ कोटी रुपयांची तरतूद

- नियमित मिळकत कर भरणाऱ्याना पुणे महानगर पालिका बक्षीस जाहीर करणार, यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद

- मिळकर आणि पाणीपट्टी दरांमध्ये कुठलीच वाढ नाही

- वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात ८ नवीन उड्डाणपूल उभारणार

- नव्याने समाविष्ट २३ गावांसाठी विशेष तरतूद

- पगार आणि पेन्शनवर सुमारे ३१०० कोटी खर्च होणार

- पुण्यात होणारे काही महत्त्वाचे प्रकल्प:

- पुण्यात कचऱ्यापासून हायड्रोजन प्रकल्प उभारणार

- वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल

- सिंहगड रोड उड्डाणपूल, नदी पुनर्जीवन प्रकल्प होणार

- डॉग पार्क, हायड्रो ऊर्जा प्रकल्प, चार्जिंग स्टेशन उभारणे आदींचा समावेश

- श्वान प्रेमींसाठी पुण्यात डॉग पार्क उभारण्यात येणार

-३१ मार्चपर्यंत ७१०० कोटींचे उत्पन्न मिळेल.

-नव्या वर्षात पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वाधिक खर्च, समान पाणीपुरवठा योजना फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्णत्वाचे उद्दिष्ट.

-११०० कोटींचा मल:निस्सारण आराखडा.

-जायकामार्फत ४०० कोटींचे कर्ज घेऊन समाविष्ट गावांत सुविधा करणार.

-उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न. ३४ गावे महापालिकेत आली आहेत. पीएमआरडीएकडून पैसे मिळणार आहेत. २३ गावांच्या इमारत परवानगीचे अधिकार पालिकेला असून ४०० कोटींचे कर्जरोखे.

- ४८ कोटी शहरी गरीब योजनेसाठी

-नव्या आर्थिक वर्षात पंतप्रधान आवास योजनेंतर्गतची २९०० घरे आणि समान पाणीपुरवठा योजना पूर्ण होईल.

-सौंदर्यीकरणावर यंदा खर्च नाही. जी-२० परिषदेच्या निमित्ताने प्राप्त होणारा निधीच यासाठी खर्च होणार.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने