PRESIDENT’S STANDARDS : 'या' चार तुकड्यांना प्रतिष्ठित राष्ट्रपती ध्वज सन्मान प्रदान



ब्युरो टीम लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते आज भारतीय लष्कराच्या  49 सशस्त्र तुकडी, 51 सशस्त्र तुकडी, 53 सशस्त्र तुकडी आणि 54 सशस्त्र तुकडी या चार सशस्त्र तुकड्यांना 25 मार्च रोजी राजस्थानच्या सूरतगढ इथे झालेल्या शानदार पथसंचलन सोहळ्यात, प्रतिष्ठित राष्ट्रपती सन्मान ध्वज अर्थात ‘निशान’ प्रदान करण्यात आले. अनेक मान्यवर आणि लष्करातील निवृत्त तसेच ज्येष्ठ अधिकारी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी या चार तुकड्यांच्या सैनिकांनी आपल्या रणगाड्यांसह केलेल्या भव्य पथसंचलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  

आर्मर्ड कॉर्प्स म्हणजेच सशस्त्र तुकडी ही भारतीय लष्कराच्या प्रमुख लढाऊ दलांपैकी एक आहे. स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या सर्व युद्धादरम्यान या सशस्त्र  तुकड्यांनी,  अपरिमित शौर्य, धाडस आणि वीरश्रीचा परिचय दिला आहे.




लष्करप्रमुखांनी यावेळी या स्टँडर्ड प्रेझेंटेशनच्या पथसंचलनाचे अवलोकन केले तसेच सशस्त्र तुकड्यांनी युद्ध आणि शांततेतच्या काळात दाखवलेले शौर्य, त्याग आणि परंपरांच्या समृद्ध वारशाचे कौतुक केले. या सोहळ्यात, प्रतिष्ठित राष्ट्रपती ध्वज सन्मान मिळवलेल्या रेजिमेंट्स म्हणजेच तुकड्यांचे लष्करप्रमुखांनी आपल्या भाषणात त्यांच्या अनुकरणीय सेवेबद्दल कौतुक केले तसेच सर्व सैनिक आणि कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. आधुनिक आणि व्यावसायिक दृष्टिकोन असलेले भारतीय लष्कर, भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सदैव सज्ज असून कोणत्याही धोक्यांपासून राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे लष्करप्रमुख यावेळी म्हणाले. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने