Radhakrishna Vikhe :दूध भेसळ रोखण्यासाठी राधाकृष्ण विखेंची मोठी घोषणा



ब्युरो टीम : 'दूध भेसळीच्या प्रकार हे मोठ्या प्रमाणावर समोर येत असून या बाबत शासनाने गांभीर्याने याची दखल घेतली आहे. असे भेसळीचे प्रकार कुठ आढळून आले तर तात्काळ टोल फ्री नंबरवर संपर्क करा,' असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शिर्डी येथे महापशुधन एक्स्पो या  कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, जि.प.च्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, कुलगुरू शरद गडाख, जिल्हाधिकारी सिध्यराम सालिमठ, मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर ,  नगर दक्षिण भाजपा अध्यक्ष अरुण मुंडे यांची उपस्थिती होती.

विखे पाटील म्हणाले,'महापशुधन एक्स्पो च्या माध्यमातून शेतकऱ्यास तसेच पशुपालक यांना नवनवीन तंत्रज्ञान तसेच कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळविता येते, या बाबत माहिती मिळते , शिवाय विविध प्रजातीचे पशू पक्षी यांचे संगोपन कशा पद्धतीने करावे, या बाबत ज्ञान मिळते. जेणेकरून होणारे नुकसान टाळून शेती पूरक व्यवसाय यशस्वी करता येईल. राज्यात आमचे सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही सातत्याने दूध भेसळ याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत ,त्यावर आम्ही कडक कारवाई देखील केली आहे, अजूनही कुठे असे प्रकार होत असतील, तर याबाबत टोल फ्री नंबर वर तात्काळ तक्रार करावी, आम्ही लगेच कारवाई करू,' असे त्यांनी सांगितले.

'पशूंच्या देशी वाणाचे संवर्धन करण्यासाठी आमचा  विभाग सातत्याने प्रयत्नशील असून या करिता अधिकारी तसेच तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन देखील आम्ही घेत आहोत, याकरीता अशा महएक्सपोची मदत होते,' असे विखेंनी सांगून ते पुढे म्हणाले, 'लम्पी संसर्गात आम्ही राज्यातील दीड कोटी पशुचे मोफत लसीकरण केले, आणि आता कायम स्वरुपी लसिकरणासाठी याची लस निर्माण देखील करण्याचे काम सुरू आहे.' राज्यात गोसेवा आयोगाच्या माध्यमातून पशू संवर्धन व संशोधन यास प्राधान्य देणार असल्याचे विखे यांनी सांगितले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने