Rahul Gandhi : वातावरण तापलं! दिल्ली पोलीस राहुल गांधींच्या घरी दाखल



ब्युरो टीम : भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमधील सभेत बलात्कार पीडितांवरील वक्तव्यावर चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांचं पथक काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या घरी दाखल झाले आहे. काँग्रेसने त्यांचच्या अधिकृत ट्विटर वरून याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, विशेष पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सागर प्रीत हुड्डा यांना राहुल गांधी भेटले. तब्बल दोन तास त्यांच्या विविध प्रश्नांना राहुल गांधी यांनी उत्तरं दिली.

काय आहे नेमका प्रकार ?

राहुल गांधी ३० जानेवारी 2023 रोजी श्रीनगरमध्ये एका सभेत बलात्कार पीडितांवर वक्तव्य केलं होतं. गांधी यांच्या या वक्तव्यानंतर पोलिसांचं एक पथक १५ मार्च रोजी राहुल गांधी यांच्या घरी गेलं होतं. पथकाने तीन तास वाट पाहिली. परंतु राहुल भेटले नाहीत. १६ मार्च रोजी एक वरिष्ठ पोलीस अधिकारी पुन्हा एकदा राहुल यांच्या घरी गेले. त्यांनीदेखील दीड तास वाट पाहिली. त्यानंतर राहुल यांच्याशी पोलीस अधिकाऱ्यांची भेट झाली. त्यानंतर राहुल यांनी नोटीस स्वीकारली. त्यानंतर काँग्रेसने सांगितलं की, 'योग्य वेळी कायद्याने नोटीशीचं उत्तर दिलं जाईल.' त्यातच आज गांधी यांच्या घरी पोलीस पोहचले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने