Rahul Gandhi : काँग्रेस पक्षासाठी मोठा झटका, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द,



ब्युरो टीम : मोदी या आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आले होते. सुरत सत्र न्यायालयाने याप्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांना सर्वात मोठा झटका बसला आहे. लोकसभा अध्यक्षांकडून राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली असून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. २०१९ साली राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाड अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यापैकी अमेठीमध्ये राहुल गांधी यांचा भाजपच्या स्मृती इराणींना पराभव केला होता. मात्र, वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी निवडून आले होते.

गेल्या आठवडभरापासूनच संसदेत राहुल गांधी यांच्या परदेशातील एका वक्तव्याविरोधात भाजपचे खासदार आक्रमक झाले होते. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज अनेकदा तहकूब झाले होते. अशातच सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालायत अपील करण्यासाठी राहुल गांधी यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यासाठी राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला होता

त्यातच, आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. हा काँग्रेस पक्षासाठी मोठा झटका मानला जात आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने