ब्युरो टीम : मोदी आडनावारून केलेल्या वक्तव्यासंदर्भात काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. यावरून आता देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच आता यावर राहुल गांधी यांच्याकडून प्रतिक्रिया आली आहे. गांधी यांनी याच अनुषंगाने एक ट्विट केले असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की, 'मी भारतासाठी लढतो आहे, आणि मी त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे.'
दुसरीकडे, राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर आता त्यांची बहीण प्रियांका गांधी मोदी सरकारवर तुटून पडल्या आहेत. त्यांनी माध्यमांसह सोशल मीडियावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रियांका गांधी यांनी काही ट्विट करून त्यांचा राग व्यक्त केलाय.
प्रियांका गांधी म्हणाल्या की, 'आमचं कुटुंब घराणेशाही करतं असा तुम्ही आरोप करता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा या देशाची लोकशाही या कुटुंबाने त्यांच्या रक्ताने उभी केली आहे. ज्यांना तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करत आहात त्या कुटुंबाने भारतातल्या जनतेचा आवाज बुलंद केला आहे. आमच्या धमण्यांमधून धावणाऱ्या रक्ताची एक खासियत आहे. तुमच्यासारख्या भ्याड, सत्तापिपासू हुकूमशहापुढे ते कधीही झुकणार नाही आणि झुकणार नाही. तुम्हाला हवं ते करा.'
टिप्पणी पोस्ट करा