Rain In Pune : होळी पेटवण्याच्या सुमारास पुण्यात पावसाची हजेरी, उत्साहावर विरजण



ब्युरो टीम : ऐन होळी पेटवण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांच्या उत्साहावर विरजण पडलं आहे. आज सायंकाळच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली. शहरातील बहुतांश भागात वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, धुळे जिल्ह्यामध्येही आज अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बळीराजा सुलतानी संकटाशी झुंजत असताना आता अस्मानी संकटानेही शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक हिरावून नेलं आहे.

आज होळीचा असल्याने सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. मात्र ऐन होळी पेटवण्याच्या सुमारास पावसाने पुण्यात हजेरी लावली. कोथरूड, सदाशिव पेठ, टिळक रोड, नवी पेठ, डेक्कन, गरवारे कॉलेज परिसर, नारायण पेठ, धानोरी, दांडेकर पूल, धानोरी, भैरवनगर, टिंगरे नगर, विश्रांतवाडी, लोहगाव या भागात पावसाच्या सरी बरसल्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने