raj thackeray : राज ठाकरेंचा राज्य सरकारला अल्टीमेट



ब्युरो टीम : माहिमजवळच्या समुद्रात  बांधण्यात येत असलेले ते अनधिकृत   बांधकाम एक महिन्याच्या आत तोडा, अन्यथा तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू, अशी गर्जना गुढीपाडव्या निमित्त शिवाजी पार्कच्या मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करताना सरकारला एक प्रकारे अल्टीमेट दिलाय.

मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले सरकारचं, प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यावर काय होतं? ते आता बघूया, असं म्हणत राज ठाकरेंनी स्क्रीनवर एक व्हिडिओ दाखवला. 'माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केलं. २ वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे. दिवसाढवळ्या हे सुरु आहे, आणि तरीही पोलीस, महापालिका ह्यांना हे दिसलं नाही?' असा सवाल राज यांनी विचारला.

'माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ह्यांना विनंती आहे की, हे पाहील्यावर तात्काळ कारवाई करा, हे अनधिकृत बांधकाम तोडा. अन्यथा तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू. जे होईल ते होईल,' असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

'एकनाथ शिंदेंना माझं आवाहन आहे की, आता तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही आता मशिदींवरचे भोंगे उतरवा. तुम्हाला जमणार नसेल तर आमच्या कृतींकडे दुर्लक्ष करा. मशिदींवरचे भोंगे आम्ही उतरवून दाखवू, असंही राज ठाकरे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने