Raksha Mantri : 'या' कंपनीकडून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे धनादेश सुपूर्द



ब्युरो टीम : सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादनविषयक नवरत्न कंपनी,  भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबीईएलने आज 27 मार्च 2023 रोजी नवी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे दुसऱ्या अंतरिम  लाभांशाच्या रुपाने  224,27,53,160.40/ रुपयांचा धनादेश सुपूर्द  केला. बीईएलने त्यांच्या भागधारकांना आर्थिक वर्ष 2022–23 साठी दुसरा अंतरिम लाभांश  60% टक्के इतका (रु. 0.60/- प्रति समभाग) घोषित केला आहे.

अंतरिम लाभांश देण्याचे  बीईएलचे हे सलग 20 वे वर्ष आहे. बीईएलने  2022–23 या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या भागधारकांना फेब्रुवारी 2023 मध्ये प्रथम अंतरिम लाभांश (रु. 0.60/- प्रति समभाग ) म्हणून 60% टक्के दिले आहेत. कंपनीने आपल्या पेडअप भांडवलावर 2021–22 या आर्थिक वर्षात एकूण 450%  लाभांश प्रदान केला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने