Ramdas Athawale : राज ठाकरें बाबत रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले...



ब्युरो टीम : महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस हे अनेकदा एकाच मंचावर दिसले आहेत. या तिघांचेही परस्पर संबंध खूप चांगले आहेत. आगामी महापालिका निवडणुका तिन्ही पक्ष सोबत लढणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र त्यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत. मात्र त्यांची आमच्या युतीला गरज नसल्याचे आठवले यांनी सांगितले आहे. रविवारी शिर्डीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभूत झालो. मात्र मला पुन्हा लोकसभा लढवण्याची इच्छा आहे. भाजपच्या नेत्यांनी विश्वास दाखवला तर मी शिर्डी लोकसभा लढणार असून मतदारसंघाच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करेन,असंही आठवले म्हणाले.

'मंत्रिमंडळाचा विस्तार केला जावा आणि आरआपीआयला मंत्रिपद मिळावं,' अशीहीही मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले पुढे असंही म्हणाले की, 'महाराष्ट्रात एकट्याच्या बळावर यश मिळवणं कठीण आहे. लोकसभेत आम्हाला तीन जागा मिळाव्यात आणि विधानसभेत आम्हाला काही जागा दिल्या जाव्यात ,अशीही मागणी आठवलेंनी केली आहे. २७ मे ला ऑल इंडियाची मिटिंग शिर्डीत होणार आहे, त्याबाबत आम्हाला काही चिंता नाही असंही आठवले यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने