Raundal : शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कारखानदारी प्रवृत्तीला जनआंदोलनातून ठेचले पाहिजे -मा. खा. राजू शेट्टी

 


ब्युरो टीम : शेतकऱ्यांना मालाला भाव मिळत नाही, जरी भेटला तरी त्याला पाडून भाव दिला जातो. कारखानदारांची मग्रुरी ही जनआंदोलनातून ठेचली गेली पाहिजे असं प्रतिक्रिया मा.खा.राजू शेट्टी यांनी इचलकरंजीमध्ये दिली.

रौंदळ या सिनेमाच्या निमित्ताने ते बोलत होते. ऊस उत्पादक शेतकरी आणि बाजारभाव यावर आधारित या चित्रपटाला मा.खा.राजू शेट्टी सर व कोल्हापूर परिसरातील शेतकरी नेत्यांनी हजेरी लावली होती. 

आंदोलन करत असताना पोलिसांनी गुढघ्याची वाटी फोडली, डोके फोडले, गुंडांनी मरूपर्यंत मारहाण करून रस्त्यावर फेकून दिलं, आणि अनेक केसेस अंगावर घेत गेली 20-25 वर्ष सुरू असलेला लढा डोळ्यासमोरुन जात होता. 

भावीपिढीने हा सिनेमा नक्की पाहावा अस आवाहन राजू शेट्टी यांनी यावेळी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने