ravindra dhangekar: कसब्यातील विजय हा ऐतिहासिक ; आमदार धंगेकर यांनी घेतली पक्षाध्यक्ष खरगेंची भेट




ब्युरो टीम: पुण्यातील कसबा मतदारसंघातील झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी आमदार रवींद्र धंगेकर यांनी कॉंग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली.

आमदार रविंद्र धंगेकर त्यांच्या निवासस्थानी भेटीसाठी गेले होते.कसबा विधानसभा मतदार संघात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल खर्गे यांनी धंगेकरांचं अभिनंदन करत सविस्तर चर्चा केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी उपस्थित होते. कसब्याचा झालेल्या पक्षाचा विजय ह ऐतिहासिक विजय असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पक्षाला नाव संजीवनी मिळाली असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे लवकरच आमदार धंगेकर सगळ्या कॉंग्रेसच्या नेत्यांची येत्या काही दिवसांत भेट घेणार आहे. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने