ब्युरो टीम : राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करत असतात. तर, राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार हे देखील वेगवेगळ्या मुद्द्यावरून केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधत असतात. मात्र राजकीय मैदानामध्ये जनतेच्या हिताच्या विविध मुद्द्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे हे दोन्ही नेते आज क्रिकेटच्या मैदानात शेजारी शेजारी बसले असल्याचे पाहायला मिळाले. आमदार रोहित पवार यांनी स्वतः एक फोटो ट्विट करीत याबाबत माहिती दिली.
रोहित पवार यांनी हा फोटो ट्विट करताना त्याला एक कॅप्शन ही दिलं आहे . त्यामध्ये रोहित पवार यांनी म्हंटल आहे की,'पक्षभेद विसरून सर्वांना एकत्र यायला भाग पाडतो, तो खेळ असतो आणि महाराष्ट्रात नेहमीच असं खिलाडू वातावरण बघायला मिळतं. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया मॅचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्यासोबतचा असाच एक क्षण…'
https://twitter.com/RRPSpeaks/status/1636731934134108161?t=Xc42SpaWG2N4GdLTXkl5OQ&s=19
रोहित पवार यांनी ट्विट केलेला हा फोटो सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत आहे. दोन्ही नेत्यांनी दाखवलेल्या या खेळाडू वृत्तीचे अनेकांनी कौतुकही केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा