Rohit Pawar : मनीष सिसोदीय प्रकरणावरून रोहित पवारांचा 'आप' ला सल्ला, म्हणाले...



ब्युरो टीम : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कुटुंबीयांना सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यावरून मात्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आम आदमी पार्टीला एक सल्ला दिलाय.

अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयच्या चौकशीत अडकलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहे.  आता सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) मनीष सिसोदिया यांच्या कुटुंबियांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस दिली आहे.  दिल्ली सरकारचे नवे मंत्री आतिशी यांना सिसोदिया यांचा बंगला देण्यात आला आहे.  सिसोदिया यांच्या कुटुंबीयांना बंगला रिकामा करण्यासाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यावरून रोहित पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया देत आम आदमी पार्टीला एक महत्त्वाचा सल्लाही दिला आहे.

रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलंय

'नियम पाळणं आवश्यक असलं तरी केवळ राजकीय सूडभावनेतून नियमबाह्य पद्धतीने अटक केलेल्या नेत्याच्या कुटुंबाला आधार देणंही तेवढंच महत्वाचं आहे. अशा परिस्थितीत मनीष सिसोदिया यांच्या कुटुंबाला ५ दिवसांत घर खाली करण्यास सांगणं हे चुकीचं वाटतं. त्याऐवजी नवीन मंत्र्याला वेगळं निवासस्थान देता आलं असतं आणि चुकीच्या पद्धतीने अटक केलेल्या नेत्याच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं जातं, असा संदेशही देता आला असता. जेणेकरून भविष्यात दडपशाहीपुढं गुडघे न टेकाता त्याविरोधात लढण्यासाठी इतरांनाही बळ मिळालं असतं,' असंही रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे. या ट्विटमध्ये आम आदमी पार्टीच्या अधिकृत ट्विटर हँडलला देखील रोहित पवारांनी टॅग केलं आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1636948981271138304?t=VPIHr8WA79cPn3uZkSZ0AA&s=19

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने