Rohit Pawar : राज्यस्तरीय मेळाव्याचे आमदार रोहित पवार स्वागताध्यक्ष


ब्युरो टीम : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे राज्यातील तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय मेळावा आणि आदर्श तालुका, जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा दि ७ एप्रिल २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे होत आहे. या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष कर्जत-जामखेडचे युवा आमदार रोहित पवार हे असून मेळाव्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तयारीबाबत नुकताच त्यांनी आढावा घेतला. 

कर्जत येथील शारदाबाई पवार सभागृहात होणाऱ्या राजस्तरीय मेळाव्याची कर्जत-जामखेडमधील नियोजन समितीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, राज्य सरचिटणीस मन्सुरभाई शेख यांनीही कर्जत येथे भेट देऊन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. तसेच नियोजन समितीच्या कामाचे कौतुक करतानाच त्यांना काही सूचनाही दिल्या आहेत. यावेळी कर्जत येथील पत्रकार गणेश जेवरे, आशिष बोरा, योगेश गांगर्डे, भाऊसाहेब तोरडमल, मच्छिंद्र अनारसे, मोतीराम शिंदे, अस्लम पठाण, जामखेडचे पत्रकार अविनाश बोधले, सुदाम वराट, अशोक वीर, किरण रेडे, पप्पूभई सय्यद आदी उपस्थित होते. त्यातच आता मेळाव्याचे स्वागताध्यक्ष रोहित पवार यांचीही मेळावा नियोजन समितीच्या सदस्यांनी भेट घेतली आहे. रोहित पवार यांना आतापर्यंत झालेल्या तयारीची माहिती समितीने दिली. 

राज्यभरातून येणाऱ्या पत्रकाराच्या राहण्यासह इतर व्यवस्था कशा पद्धतीने करण्यात येणार आहे, याबाबतही रोहित पवार यांना माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवावे याबाबत सुद्धा रोहित पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्या अनुषंगाने लवकरच प्रमुख पाहुण्यांचे नाव निश्चित करण्यात येणार आहे.  या मेळाव्यास तालुका, जिल्हाध्यक्ष तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आले आहे. 

दरम्यान, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, राज्य सरचिटणीस मन्सुरभाई शेख, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके आदींच्या मार्गदर्शनाखाली हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी नियोजन समिती काम करीत आहे.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने