Sandeep Deshpande attack : 'अशा हल्ल्यांना मी घाबरणार नाही, संदीप देशपांडेची पहिली प्रतिक्रिया



ब्युरो टीम : ‘अशा हल्ल्यांना मी घाबरणार नाही. मी माझं काम करत राहील. ज्यांना वाटतं मी या हल्ल्यानं घाबरेल, त्यांना मी स्पष्टपणे सांगतो की, याने मी घाबरणार नाही,’ अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. ‘असा घाबरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आम्ही कुणालाही भीक घालत नाही. यामध्ये कोण लोक आहेत, हे सर्वांना माहिती आहे, ‘ असेही त्यांनी स्पष्ट केलं.

आज सकाळी संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कमध्ये गेले होते. तेव्हा शिवाजी पार्कमध्ये असलेल्या एका टोळक्यानं त्यांच्यावर स्टम्पच्या साहाय्यानं हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याचं सांगण्यात येतंय. या हल्ल्यानंतर देशपांडेंना तातडीनं हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना आरामासाठी घरी सोडण्यात आलं. यावेळी त्यांनी या हल्ल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

दरम्यान, दुसरीकडे या हल्ल्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. मनसेच्या नेत्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता यावर काय भूमिका घेतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने