Shirdi : साईबाबांच्या शिर्डीत रामनवमी उत्सव सुरु

 


विक्रम बनकर, नगर : शिर्डी येथे श्री रामनवमी उत्‍सवानिमित्‍त श्रींची प्रतिमा, विणा व पोथीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्‍थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ यांनी पोथी, प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी वीणा, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे व प्र.प्रशासकीय अधिकारी संजय जोरी यांनी प्रतिमा घेवुन सहभागी झाले होते. याप्रसंगी मुख्‍य लेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे, मिनाक्षी सालीमठ, कावेरी जाधव, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्‍त व ग्रामस्‍थ उपस्थित होते.

उत्सवानिमित्त व्‍दारकामाई मंदिरात अखंड पारायणास सुरवात करण्‍यात आली. यावेळी प्रथम अध्यायाचे वाचन करताना तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ व त्‍यांची सुविद्य पत्‍नी मिनाक्षी सालीमठ यांनी केले. तसेच त्यांच्या हस्‍ते पाद्यपुजा करण्‍यात आली. 



मंदिर व परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई

रामनवमी निमित्त व्‍दारकामाई मंडळ, मुंबई यांच्‍या वतीने समाधी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली. तर मंदिर प्रवेशव्‍दारावर श्रीराम, लेंडीबागेत साई पालखी मिरवणुक व श्री साई प्रसादालयाच्‍या प्रवेशव्‍दारावर शिव भोला भंडरी..साई भोला भंडारी हे भव्‍य देखावे उभारले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने