Shivaji Kardile : नगरच्या राजकारणातील 'किंग मेकर' ठरले जिल्हा बँकेचे 'किंग'



ब्युरो टीम : नगरच्या राजकारणात 'किंग मेकर' म्हणून ओळख असलेले भाजप नेते माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि आज नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनपेक्षित बाजी मारली. अचानक निवडणुकीत ट्विस्ट आणत कर्डिले स्वतः बँकेचे 'किंग' बनले आहेत.

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्षपदाची आज निवड हाेणार होती. या निवडीसाठी आज सकाळी अकरा वाजता संचालक मंडळाची विशेष सभा आयोजिण्यात आली होती. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर हाेते. मविआने चंद्रशेखर घुलेंची अध्यक्षपदासाठी नाव निश्चित केल्याने त्यांनी अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्जही भरला. पण अर्ज भरण्याच्या अखेरच्या मिनिटाला भाजपच्या वतीने अचानकपणे माजी आमदार शिवाजी कर्डिले  यांचा देखील अर्ज आला. त्यामुळे या निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला. एकीकडे चंद्रशेखर घुले यांचा एकच अर्ज आला असल्यामुळे त्यांचा निवडीचा जल्लोष सोशल मीडियावर सुरू हाेता. अचानक भाजपच्या वतीने अर्ज आल्याने आता काेण बाजी मारणार याकडे नगरवासियांचे लक्ष लागून राहिलं हाेते.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान घेतले. या मतदानामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील यांना नऊ मते मिळाली. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना दहा मते मिळाली. एक मतदार तटस्थ राहिल्याने या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने