विक्रम बनकर, नगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाचा पदभार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी स्वीकारला. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील यांचे आभार मानले.
शिवाजी कर्डिले म्हणाले, 'अहमदनगर जिल्हा बँकेवर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला दोन वेळेस चेअरमनपदाची संधी मिळाली आहे. मी बँकेच्या निवडणुकीमध्ये ज्या पॅनल मधून निवडून आलो होतो. त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मला विश्वासात घेतले नसल्यामुळेच बँकेची चेअरमन पदाची निवडणूक झाली. जर विश्वासात घेतले असते तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पडली व संचालक मंडळाने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला चेअरमन पदाची संधी दिली. या माध्यमातून शेतकरी, कारखानदार, व्यवसायिक व महिला बचत गट यांना मदत केली जाईल. आज सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुण्यतिथी निमित्त पदभार स्वीकारला आहे. याचबरोबर बँकेचे संचालक, माजी संचालक जिल्ह्यातील साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांचा सत्कार करण्यात आला आहे. बँकेची राजकारण विरहित सुरू असलेली परंपरा अशीच सुरू राहील.'
कर्डिले पुढे म्हणाले की, 'आधुनिक तंत्राच्या युगामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये नॅशनलाईज बँकेचे आव्हान उभे आहेत. ई-बँकिंग सेवा ठेवीदार, कर्जदार व खातेदारांना देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे. बँकेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी लवकरच सातशे कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. त्यानंतर उर्वरित पाचशे कर्मचाऱ्यांची ही भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील उमेदवारांना संधी देण्याचे काम केले जाईल. राहुरी सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर मी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे भेट घेतली. तसेच सर्व संचालक मंडळातील सदस्यांची फोनवरून चर्चा झाली आहे. माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा झाली आहे. सर्वांना बरोबर घेऊनच बँकेचा कारभार केला जाईल,' असेही ते म्हणाले.
यावेळी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के, सिताराम गायकर, माजी आमदार भानुदास मुरकुटे, प्रशांत गायकवाड, संचालिका अनुराधा नागवडे, मीनाक्षी ताई पठारे. अंबादास पिसाळ. अमित भाकरे. अमोल राळेभात. संपत म्हस्के, सुरेश पठारे, बाळासाहेब भोसले, प्रेमाकाका भोईटे, ईश्वरराव कदम, शंकर राजळे, सुभाष पाटील, रावसाहेब पाटील शेळके, रामभाऊ लिपटे, सुरेश साळुंखे, दत्तात्रय पानसरे, रावसाहेब म्हस्के, राजेंद्र नागवडे, अशोक देशमुख, डी.डी.आर, गणेश पुरी, रामसिंग काळे, वंदनाताई पवार, तुषार पवार आदी उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा