shivaji maharaj; छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास सांगणाऱ्या सिनेमांना ' कोटींचं अनुदान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा



ब्युरो टीम: मराठी सिनेसृष्टीत सध्या नवं नवीन प्रयोग होताहेत. चांगले कथानक त्यासोबतच व्हीएफएक्स सारख्या तंत्राच्या वापरामुळे प्रेक्षक देखील या चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. ऐतिहासिक चित्रपटांना मिळणारी प्रेक्षकपसंती पाहता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी सिनेसृष्टीसाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठी सिनेसृष्टीला चालना देण्यासाठी आणि चांगले सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी हे निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

त्यात ‘हर हर महादेव, सरसेनापती हंबीरराव, फर्जंद, फत्तेशिकस्त, अशा ऐतिहासिक चित्रपटांनी दमदार यश मिळवल्याने सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची चलती सुरु असल्याचे दिसून येते.

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, मराठी सिनेमांना तीन महिन्यात शासकीय अनुदान मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट मराठी इंडस्ट्रीत निर्माण होत आहेत. या सिनेमांसाठी याशिवाय अन्य विषयांवरील प्रेरणादायी सिनेमांसाठी सरकार तब्बल 1 कोटीचे अनुदान देणार आहे.

तसेच, ‘फिल्म बाजार’ ही ऑनलाईन वेबसाईट तयार करणार असून, येणाऱ्या काळात महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाला याचा मोठा हातभार लागणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे. या प्रक्रियेत मराठी सिनेसृष्टीतील अनेक बडे कलाकार सहभागी असणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने