shivsena ncp : राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार धक्का! महाविकास आघाडीतील ठाकरे गट कमालीची गुप्तता पाळत घेणार वेगळी भूमिका....



ब्युरो टीम: सद्या राज्यात  राष्ट्रवादी कॉंग्रेस, इंदिरा कॉंग्रेस व उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी असून राज्यात त्यांनी या नावाने अडीच वर्ष सरकार चालवले आहे. परंतु शिवसेनेत फुट पडल्या नंतर मात्र महाविकास आघाडीच फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे.

त्याचाच भाग म्हणून गुहागरमध्ये ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याच्या प्रयत्नात आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खेडच्या सभेमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नावाबद्दल गुप्तता पाळण्यात आली आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडी एकत्रित आहे. तरीसुद्धा राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आता ठाकरे गटामद्धे येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटातुन गेलेले कार्यकर्ते पुन्हा येत आहेत. तर राष्ट्रवादीमधील काही कार्यकर्तेही ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. पक्षप्रवेश करणारी मोठी नावे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तर या नावाबद्दल ठाकरे गटाने कमालीची गुप्तता बाळगली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणी आत्तापासूनच सुरू झाली आहे.

राज्यात महाविकास आघाडी असताना राष्ट्रवादी आणि ठाकरे गट हे मित्रपक्ष असतानाही कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर आरोप करत काही नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. पण आता उद्धव ठाकरे यांची सभा आहे याच पार्श्वभूमीवर काही कार्यकर्ते राष्ट्रवादीतुन ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने