ShivSena vs Thackeray Group : ठाण्यात शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने, वाचा नेमकं काय झालं?



ब्युरो टीम : ठाण्यातील शिवाईनगर येथील शिवसेना शाखेवरून शिवसेना (शिंदे गट) व ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना शाखेवर  शिंदे गटाने ताबा घेतला आहे.

शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नरेश म्हस्के म्हणाले की, 'ही शाखा शिवसेनेची शाखा आहे. ही आमची शाखा आहे. याठिकाणी आमचे लोक बसून काम करतात. प्रताप सरनाईक यांनी ही शाखा बांधली आहे. धर्मवीर आनंद दीघे यांच्यानंतर ठाण्याचा संपूर्ण कारभार एकनाथ शिंदे यांनी सांभाळला आहे.'

दुसरीकडे,शिवसेनेने ही शाखा बळजबरीने बळकवल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून शाखेच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. हा वाद चिघळू नये यासाठी ठाणे पोलिसांकडून  मोठा फौजफाटा शाखेबाहेर तैनात करण्यात आला होता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने