ब्युरो टीम : अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि ''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे,'असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकटदिन आहे. चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे प्रकट झाले. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाविषयी एक कथाही सांगितले जाते.
इ.स. १४५९ च्या सुमारास (माघ वद्य १, शके १३८०) श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात महाराजांनी सुमारे ३०० वर्षे कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्याभोवती वारूळ निर्माण केले.
एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्हाड निसटली व ती वारूळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत असे मानले जाते.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'मराठी प्रिंट' याची खातरजमा करत नाही.)
टिप्पणी पोस्ट करा