ब्युरो टीम : 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथी प्रमाणे चैत्र शुध्द द्वितीया या दिवशी असतो. यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये ही तिथी आज, गुरुवार २३ मार्च रोजी असून आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा होत आहे. भक्तांच्या इच्छा पूर्ण करत त्यांना आयुष्याच्या मार्गावर मार्गदर्शन करणाऱ्या स्वामींचरणी आज सर्वजण नतमस्तक होत आहेत. चला, तर या पार्श्वभूमीवर आजच्या दिवसाचे पंचांग जाणून घेऊ.
आजचा वार - गुरुवार
तिथी- द्वितीया
नक्षत्र - रेवती
योग - इंद्रा
सूर्योदय - सकाळी 06:22 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.33 वाजता
चंद्रोदय - 07:21
चंद्रास्त - 20:23
चंद्र रास- मीन
शुभ काळ - अभिजीत मुहूर्त - 12:03:43 पासुन 12:52:29 पर्यंत
टिप्पणी पोस्ट करा