ब्युरो टीम : श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा आज, गुरुवारी (२३ मार्च) अक्कलकोट इथं विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. स्वामींच्या प्रकटदिनी हजारो भक्तगण अक्कलकोटला येत असून त्यांच्यासाठी स्वामींचा प्रकट दिन सोहळा ही एक पर्वणीच ठरणार आहे.
प्रकटदिनी पहाटे ५ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची काकड आरती होईल. सकाळी १० ते १२ या वेळेत देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट पांच्या वतीने भजन होऊन श्रींच्या चरणी गुलाल पुष्प वाहून स्वामींचा जन्म सोहळा संपन्न होईल. त्यानंतर पाळणा, भजनगीत व आरती होवून स्वामींचा प्रकट दिन सोहळा संपन्न होईल. दुपारी १२ ते २ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येईल.
दरम्याम, श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून त्यांच्या अनुयायांनी राज्यभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा