ब्युरो टीम : महिलांना सरसकट एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्या निर्णयाची अंमलबजावणी आज १७ मार्च २०२३ पासून सुरू झाली आहे. आजपासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला होता. या अर्थसंकल्पात त्यांनी महिलांना एसटी प्रवासात ५० टक्क्यांची सूट देण्याची घोषणा केली होती. त्याच बरोबर महिलांना सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण लागू करणार असल्याचे ते म्हणाले. त्यानुसार अर्थसंकल्पात केलेल्या घोषणाची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. आजपासून महिलांना सरसकट एसटीच्या तिकीट दरात सरसकट ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आहे.
टिप्पणी पोस्ट करा