ब्युरो टीम : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. या ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर अनेक शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती अद्याप थांबत नाहीये. आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून उद्धव ठाकरेंच्या अनेक निष्ठावंतांनी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. अनेक मंत्री आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व अमान्य असल्याचं सांगत शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला. मात्र या सगळ्यात उद्धव ठाकरेंबरोबर काही जुनी खोडं राहिली होती. त्यात लिलाधर डाके, मनोहर जोशी, सुभाष देसाई अशी मंडळी होती. मात्र आता जुन्या खोडांची पुढची पिढी नव्या विचाराच्या तयारीत आहे. कारण आता सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा