विक्रम बनकर, नगर : 'महाविकास आघाडीचे सरकार हे स्वार्थी सरकार होतं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला बाजूला ठेवून स्वतः मुख्यमंत्री होऊन स्वतःच्या मुलाला कॅबिनेट मंत्री करण्याची धडपड एवढ्याच एका अजेंड्यावर ते सरकार स्थापन झालं होतं,' असा घणाघाती आरोप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी करतानाच महाविकास आघाडीवर त्यांनी तोफ डागली. ते आज अहमदनगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथे माध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडीवर टीका करताना खासदार विखे पाटील म्हणाले,'महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा स्थापन झालं होतं, तेव्हा त्यामध्ये प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वार्थ होता की, त्यांना माहिती होते सर्व मलाईदार खाते आपल्याकडे ठेवल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात सत्ता मिळवता येईल. तर मविआ सरकारमधील मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मुलाला लॉन्च करायचे होते, म्हणून त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तर काँग्रेसला राज्यात कोणीच विचारत नव्हतं. मात्र ४० आमदारांमध्ये त्यांना दहा मंत्री पद मिळाले, म्हणून तेही लाईन मध्ये उभे राहिले होते,' असा टोलाही खासदार विखे पाटील यांनी लगावला.
विखे पाटील पुढे म्हणाले, 'मागील महाविकास आघाडीचे सरकार हे स्वार्थी होते. परंतु आजचे आलेले सरकार हे जनतेने निवडून दिलेले सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे सरकार हे सर्वसामान्य नागरिकांचे आहे. शेतकऱ्यांचे आहे. नुकत्याच सादर झालेल्या बजेट मधून सरकारने हे दाखवून दिलेले आहे.
पहा व्हिडीओ
टिप्पणी पोस्ट करा