thackeray and fadnavis : चर्चा तर होणारच! देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे हसतखेळत एकमेकांशी गप्पा मारत विधिमंडळात



ब्युरो टीम : गेल्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडल्या आहेत. या राजकीय घडामोडींचा परिणाम एकेकाळी मित्र असलेले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मैत्रीवर झाल्याचे जाते. पण आज विधिमंडळाच्या आवारात असे काही दृश्य दिसले, ज्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील बंड आणि त्यानंतर गेल्या ९ महिन्यांपासून सुरु असलेल्या राजकीय सत्तासंघर्षामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मित्रत्त्वाच्या नात्यात प्रचंड दुरावा निर्माण झाला आहे. मात्र, या सगळ्याला छेद देणारे चित्र गुरुवारी विधानभवनात पाहायला मिळाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी हे दोन्ही नेते विधानभवनाच्या आवारात एकत्र दिसून आले. यानंतर ठाकरे आणि फडणवीस यांनी त्यांच्यातील राजकीय हेवेदावे बाजूला ठेवता एकमेकांशी गप्पा मारल्या. दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य होते. एकमेकांशी छान गप्पा मारत हे दोघे विधिमंडळात गेले. 

दरम्यान, सध्या या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस पडताना दिसतोय.

पहा व्हायरल व्हिडिओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने