Tourist Places : देवच पावला! 'या' जिल्ह्यातील सहा पर्यटन स्थळांना निधी, खासदार विखेंचा पुढाकार



ब्युरो टीम : प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील सहा पर्यटन क्षेत्रास चार कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी ही माहिती दिली. 

नगर जिल्ह्यातील आगडगाव येथील काळभैरवनाथ,केडगाव येथील रेणुकामाता देवस्थान मंदिर, जवळा येथील जवळेश्वर मंदिर, श्रीगोंदा येथील शेख मोहम्मद महाराज मंदिर, पाथर्डी येथील वृध्देश्वर देवस्थान आणि शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील गणपती मंदिर सुशोभीकरण्यासाठी एकूण चार कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे. या भागातील ग्रामस्थ या मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाची मागणी सातत्याने करत होते. त्यामुळे या करिता हा निधी विशेष प्रयत्न करून मंजूर केला असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, या मंदिर परिसराचे सुशोभीकरण आता चांगल्या पद्धतीने होणार असल्याने या भागातील ग्रामस्थांनी सुजय विखे यांचे आभार मानले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने