TwitterDown: ट्विटर झाले डाऊन युजर्स करत आहेत अडचणींचा सामना

 


   सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर वापरण्यात युझर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जगभरात ट्विटर डाऊन असल्याच्या तक्रारी युझर्सनं केल्या आहेत. तसंच यासाठी #twitterdown हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आला आहे. 

  दरम्यान ट्विटरचं पेज ओपन होत असलं तरी युझर्सना इतरांचे ट्विटस मधील व्हिडिओ व इमेजेस दिसेनासे झाले आहेत. गेल्या तासाभरापासून युझर्सना या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, ट्विटरकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले असून काही फीचर अपडेट करत असल्यामुळे या समस्येचा सामना युजरला करावा लागत आहे, याबाबत ट्विटरची टेक्निकल टीम काम करत असून फीचर अपडेट झाल्यानंतर याबाबतची माहिती देण्यात येईल असे ट्विटर द्वारा ट्विट करून सांगितले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने