ब्युरो टीम : हवामान खात्याने उद्या, गुरुवारी (१६ मार्च) राज्यातील ४ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. यामध्ये पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. इथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी मुंबई ते गडचिरोली आणि कोल्हापूर ते नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. अशात आता पुढचे ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. १५ मार्च ते १८ मार्चपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपीटी पडण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर यावेळी वाऱ्याचा वेगळी जास्त असेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच मुंबई, पालघर, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता राज्यात सर्वदूर पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या ५ दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस होईल. यावेळी गारपीटही होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा