Women Maharashtra Kesari : प्रतिक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी



ब्युरो टीम : सांगलीची प्रतिक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी झाली आहे. तिने कल्याणच्या वैष्णवी पाटील हिचा अंतिम फेरीत पराभव करीत हा किताब पटकावला.  अंतिम फेरीचा लढत ही चांगलीच रंगली, पण अखेर प्रतिक्षा बागडीने बाजी मारली आणि प्रथम महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.

उपांत्य फेरीत प्रतिक्षा आणि वैष्णवी पाटील यांनी दणदणीत विजय मिळवले होते. प्रतिक्षाने कोल्हापूरच्या अमृता पुजारीवर ९-२ असा दमदार विजय मिळवला होता. वैैष्णवीने उपांत्य फेरीच्या लढतीत कोल्हापूरच्या कुशप्पाचा ११-१ असा मोठा विजय मिळवला होता. वैष्णवी या सामन्यात भन्नाट फॉर्मात दिसली होती. त्यामुळे वैष्णवी पाटील आणि  प्रतिक्षा बागडी यांच्यापैकी महिला महाराष्ट्र केसरीचा मान कोण पटकावणार, याची उत्सुकता शिगेला लागलेली होती. अखेर अंतिम फेरीत प्रतीक्षाने बाजी मारत हा मान पटकावला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने