World Woman Day : दिव्यांगत्वावर मात करीत योगासनपटू दियाची राष्ट्रीय झेप


ब्युरो टीम : बहिरेपणाचे दिव्यांगत्व आयुष्यभरासाठी साथीला असले तरी त्या दुःखाला उराशी कवटाळून बसण्यापेक्षा कथ्थक नृत्य वयोगासनांसह रोप मल्लखांबमध्ये रमलेल्या येथील दिया राजेंद्र जासूद या युवतीनेमहाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय पॅरा योगासनस्पर्धेत सुवर्णपदक पटकावले व नॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशनद्वारे नियोजितअसलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळवले आहे. या राष्ट्रीयस्पर्धेत चमकदार कामगिरी करून पॅरा ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे ध्येय तिने ठेवलेआहे. पॅरा ऑलिम्पिकमध्ये नगरचा लौकिक पोहोचणार्‍या दीपा मलिक यांचा आदर्शदियासमोर आहे.

नगरमध्ये विशेष योगा गर्ल म्हणून दिया जासूद या युवतीची ओळखआहे. सहावीपर्यंत तिने कथ्थक शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेऊन त्यात ती विशारद झाली.सातवीपासून तिने योगाभ्यास सुरू केला तोे करता करता दुसरीकडे तिने रोपमल्लखांब (दोरीवरचा) सरावही सुरू केला. या दोन्ही क्रीडा प्रकारात तिचे मनरमले. या दोन्ही खेळांतील सुमारे 35-40च्यावर छोट्या-मोेठ्या स्पर्धांतूनतिने सर्वसामान्य खेळाडू कॅटेगरीतून सहभाग घेतला. अलिगड (युपी) ऑलइंडिया इंटर युनिर्व्हसिटी मल्लखांब स्पर्धेसह कोलकता, मुंबई, पुणे, दिल्लीतसेच औरंगाबाद, बीड, नगर व देशभरातील विविध स्पर्धांतून तिचे सादरीकरण झाले.बालिकाश्रम रोडवरील महावीर मल्लखांब योगा ट्रेनिंग सेंटरमध्ये गेल्या आठवर्षापासून योगाचा सातत्याने सराव करीत आहे. आतापर्यंत तिने विविध जिल्हा स्तरावरीलस्पर्धांतून योगासन व रोप मल्लखांब सादरीकरणाची बक्षिसे मिळवली आहे व या स्पर्धांतील सहभागानेतिचा आत्मविश्‍वासही दुणावला आहे. त्यानंतर तिने दिव्यांगत्व असलेल्याखेळाडूंसाठीच्या विशेष कॅटगरीतून जिल्हा स्तरावरील योगासन स्पर्धेत भागघेतला व पहिल्याच प्रयत्नात सुवर्णपदक पटकावले. यातून महाराष्ट्र योगासनस्पोर्टस फेडरेशनने पुण्यात आयोजित केलेल्या राज्य स्पर्धेत निवड झाल्यावरतेथे नागपूर, पुणे, मुंबई व अन्य ठिकाणच्या विशेष खेळाडूंपेक्षा सुरेखसादरीकरण करीत सुवर्णपदक पटकावल्याने तिची आता राष्ट्रीय स्पर्धेसाठीनिवड झाली आहे. येत्या एप्रिल-मे महिन्यात मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे याराष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत. त्यात भाग घेताना राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकून सुवर्णपदकांची हॅटट्रीक करण्याची व त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांतून योगासन कसबदाखवून देशाला पदक मिळवून देण्याचे ध्येय तिचे आहे व त्यामुळे ती कधी एकदा राष्ट्रीयस्पर्धांच्या तारखा जाहीर होतात, याकडे डोळे लावून बसली आहे.

पालक व शिक्षकांचे पाठबळ 

तीन-चार वर्षांची असतानाच दियाला ऐकायला येत नाही, हेपालकांच्या लक्षात आले होते. पण त्याची जाणीव त्यांनी तिला दिली नाही. आवश्यक तेवैद्यकीय उपचार केल्याने तिला थोडे थोडे ऐकू येते व बोलताही येते. पण,अन्य मुलांप्रमाणेच आपणही आहोत, अशी भावना तिच्यात रुजण्यासाठी आई सौ. भारतीजासूद व वडील राजेंद्र जासूद यांनी विशेष दक्षता घेतली. तिला कथ्थक शास्त्रीय नृत्याचेशिक्षण दिले व नंतर योगासन आणि रोप मल्लखांब प्रशिक्षणासाठीही प्रोत्साहन दिले. शास्त्रीयनृत्याचा पाया पक्का असल्याने दियाने आता आर्टिस्टिक योगा व रोपमल्ल्लखांबमध्ये मास्टरी मिळवली आहे. सावेडीतील महावीर मल्लखांब व योगाट्रेनिंग सेंटरचे संस्थापक उमेश झोटींग, राज्यस्तरीय योगापटू प्रणितातरोटे व योग प्रशिक्षक अप्पा लाढाणे यांनी दियाला घडवले आहे. विशेषम्हणजे दिया ही दिव्यांगत्वामुळे विशेष खेळाडू असली तरी तिला योग व रोपमल्लखांबचे प्रशिक्षण देणारे विशेष मुलांसाठीचे विशेष शिक्षक नाहीत. त्यामुळे तिलाशिकवता शिकवता विशेष मुलांना कसे शिकवायचे, याचे शिक्षणही तिच्या प्रशिक्षकांनामिळाले. त्यामुळे एकीकडे दिया त्यांना गुरू मानते व दुसरीकडे तेहीतिच्यामुळे विशेष मुलांचे भावविश्‍व व त्यांच्यातील गुणकौशल्य आम्हालाही शिकायला वपाहायला मिळाल्याचे सांगत तिला गुरू मानतात. 

मूळच्या भोरवाडी (ता. नगर) येथील असलेल्या जासूदपरिवाराने दियामध्ये आत्मविश्‍वास जागवला आहे. ती विविध स्पर्धात औरंगाबाद विभागातूनखेळते व यासाठी तिला तिच्या एस. के. गांधी कॉलेजनेही (कडा, ता.आष्टी, जि. बीड) प्रोत्साहन दिले आहे. पुण्या-मुंबईतील विशेष खेळाडूंनाघडवायला विशेष शिक्षक असतात व ते त्यांच्याकडून नियमितपणे सराव करून घेतात.या पार्श्‍वभूमीवर, नगरसारख्या ठिकाणी राहून प्रशिक्षण घेत राज्य स्पर्धेत मिळवलेलेसुवर्णपदक दियाच्या जिद्दीची कहाणी सांगणारेच आहे...

जेवढे अवघड, तेवढे गुण

राज्य व राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी 250वर आसनांचाअभ्यासक्रम आहे. जेवढे अवघड आसन केले जाईल, तेवढे जास्त गुणखेळाडूला मिळतात. याशिवाय आर्टिस्टिक व र्‍हीदमिक योगासनेही विशेष गुणमिळवून देतात. हातावर बॅलन्स करणारे हस्तलिकरासन तसेच धनुरासन, वृश्‍चिकासन,शलवासन, राजकपोत, नटराज अशी यात काही योगासने असून, यात पुढे वाकून,मागे वाकून, शरीर वळवून, उभे राहून, बसून योगासने करावी लागतात. प्राथमिक,क्वॉटर फायनल, सेमी फायनल व फायनल अशा चार टप्प्यात प्रत्येकी 5-5 वेगवेगळीव अवघड आसने खेळाडूंना करावी लागतात व त्यावरून गुणदान होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने