world women day : महिला सक्षमीकरणाबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...



ब्युरो टीम : 'राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवित असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हे सर्वसामान्यांचे सरकार असून महिला सक्षमीकरणास सर्वोच्च प्राधान्य आहे,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  केले.

जागतिक महिला दिनानिमित्त अंधेरी येथील मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात  शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, अभिनेत्री अरुणा इराणी, डॉ.भारत बालवल्ली, वीर सेनानी फाऊंडेशनचे कर्नल पत्की यांचा सत्कार करण्यात आला. मुक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा स्मिता ठाकरे यांचेसह मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

'देशासाठी अनेक कर्तृत्ववान महिलांनी आपले मौलिक योगदान आहे. राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी तसेच महिला भगिनींना ताकद देण्यासाठी मी भावासारखा पाठीशी उभा राहणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने अनेक जण कार्यरत असतात. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे कार्य 'मुक्ती फाऊंडेशन' सारख्या संस्था करीत  आहे़, असे सांगून महिला सबलीकरणासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा सन्मान मुक्ती फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या संस्थेचे कौतुक केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने