Xi Jinping: जिनपिंग यांची चीनच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड; करोना वाताहतीनंतरही करिष्मा कायम ...

 


ब्युरो टीम: कायमचा हुकुमशाही कारभार आणि करोना काळातील कठोर निर्बंध यामुळे देशभरात त्यांच्या विरोधात अस्वस्थता होती. असे असतानाही जिनपिंग यांना सर्वानुमते तिसऱ्यांदा जिनपिंग यांची सर्वानुमते पुन्हा एकदा चीनचे  राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.  यांच्या विरोधात पक्षातून दुसरा उमेदवार उभा राहिला नाही. यामुळे त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली. माओत्से तुंग यांच्यानंतरचे सर्वात शक्तीशाली नेते म्हणून जिनपिंग यांनी चीनवर पकड मजबूत केली आहे.

चीनच्या रबर-स्टॅम्प संसदेच्या जवळपास 3,000 सदस्यांनी, नॅशनल पीपल्स काँग्रेस (NPC) ने एकमताने जिनपिंग यांना मतदान केले. 69 वर्षीय शी यांच्यासाठी ग्रेट हॉल ऑफ द पीपल येथे मतदान पार पडले. समोर कोणी प्रतिस्पर्धी नसला तरी हे मतदान घेण्यात आले. हे मतदान जवळपास १ तास सुरु होते. तर मोजणी १५ मिनिटांत पूर्ण झाली. तर संसदेचे अध्यक्ष म्हणून झाओ लेजी आणि उपाध्यक्ष म्हणून हान झेंग यांची निवड करण्यात आली.

जिनपिंग यांनी २०१८ मध्येच राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळाची मर्यादा संपुष्टात आणली होती. गेल्या ऑक्टोबरमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सरचिटणीसपदी आणखी पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. याचबरोबर शी जिनपिंग यांना केंद्रीय सैन्य आयोगाचे तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून देखील निवडण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने