Aap: 'आप'च्या शेली ओबेरॉय दुसऱ्यांदा दिल्लीच्या महपौरपदी



ब्युरो टीम: आम आदमी पक्षाच्या (आप) शेली ओबेरॉय यांची बुधवारी, 26 एप्रिल रोजी एकमताने दिल्लीच्या महापौरपदी निवड करण्यात आली. भाजप उमेदवार शिखा राय यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर ओबेरॉय यांना दिल्ली महानगरपालिकेचे महापौर म्हणून दुसरी टर्म मिळाली आहे.

स्थायी समितीची निवडणूक झाली नसल्यामुळे आपण उमेदवारी मागे घेतल्याचे राय यांनी सभागृहात सांगितले.

सध्याचे उपमहापौर आप चे आले मोहम्मद इक्बाल यांना या पदावर आणखी एक टर्म मिळाला, कारण भाजपच्या उमेदवार सोनी पाल यांनीही शर्यतीतून माघार घेतली. महापौरपदाच्या निवडणुकीच्या निकालाचे सत्ताधारी आप पक्षाने स्वागत केले.

'यावेळी बिनविरोध महापौर आणि उपमहापौर झाल्याबद्दल शेली आणि पाल यांचे अभिनंदन. दोघांनाही शुभेच्छा. लोकांच्या आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा', असे आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

'आप'चे ज्येष्ठ नगरसेवक मुकेश गोयल हे महापौरपदाच्या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी होते. गोयल हे दिल्ली महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत.

शेली ओबेरॉय यांची 22 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या महापौरपदी निवड करण्यात आली होती, त्यानंतर आप आणि भाजपच्या नगरसेवकांमधील संघर्षामुळे याआधी तीन प्रयत्न विफल झाले होते. ओबेरॉय यांनी भाजपच्या रेखा गुप्ता यांचा 34 मतांनी पराभव केला होता. ओबेरॉय यांना 150 मते मिळाली, तर गुप्ता यांना एकूण 266 मतांपैकी 116 मते मिळाली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने