ब्युरो टीम : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून भाजपात जाण्याच्या चर्चेवरून खुलासा केल्यानंतरही खासदार संजय राऊत यांच्याकडून अजित पवार यांच्याबाबत वक्तव्ये केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी आज खोचक प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यावर अजित पवारांना विचारले असता त्यांनी, 'कोण संजय राऊत?' असा प्रतिप्रश्न केला.
माझ्याबाबत पसरविण्यात आलेल्या बातम्यांबाबत मी बोललो आहे. त्यात कोणाचेही नाव घेतलेले नाही, मी आणि माझा पक्ष याबाबत बोललो. त्यामुळे कोणाला लागायचे काहीच कारण नाही. कोण संजय राऊत? असा सवाल करत मी बोलताना कोणाचे नाव घेतलेले नव्हते. तरीदेखील काहीजण अंगावर ओढवून घेतात, असा टोलाही पवार यांनी लगावला.
टिप्पणी पोस्ट करा