Ajitpawar: अजित पवारांमुळे ‘नायक’ चित्रपटाची आठवण; 'या' व्यक्तीला दिली आमदारकीची खुली ऑफर

 


ब्युरो टीम: अजित पवार कधी काय बोलतील सांगता येत नाही त्याचा प्रत्येय पुन्हा एकदा आला. आज बारामती दौऱ्यावर असताना पत्रकाराच्या एका प्रश्नावर बोलताना अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी  बाबा ‘आता तूच बारामतीचा आमदार हो’ अशी खुली ऑफर दिल्याने पत्रकारही बुचकळ्यात पडला.

पत्रकारांनी प्रश्न विचारला की दादा तुम्ही दिलेला शब्द ही काळ्या दगडावरची रेष असते आणि पत्रकाराच्या याच प्रश्नाला उत्तर देताना अजितदादांनी ए बाबा असं काही नसतं! म्हणत उद्या मी उद्या म्हणालो की तू बारामतीचा आमदार हो ही काळा दगडावरची रेष खरी होणार आहे का? असा असा उलट प्रश्न विचारत दादांनी पवार शैलीत उत्तर दिलं आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

 परंतु यामुळे  अनिल कपूरच्या ‘नायक चित्रपटाची मात्र सर्वाना आठवण आली. यामध्ये मुख्यमंत्री असलेल्या अमरीश पुरी यांनी पत्रकार असलेल्या अनिल कपूरल अएका दिवस्दाचे मुख्यमंत्री बनण्याची ऑफर दिली होती .

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने