Ajitpawar: मुंबईत राष्ट्रवादीचे शिबिराला अजित पवारा अनुपस्थित? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं....

 


ब्युरो टीम: आज राष्ट्रवादीच्या मुंबई विभागाचं शिबीर आहे. मात्र या शिबीरामध्ये सहभागी होणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवारांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर देखील राष्ट्रवादीत धूसपूस सुरूच आहे का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.


त्यातच शिबीरात सहभागी न होता अजित पवार पुणे दौऱ्यावर असल्यानं चर्चेला आणखी उधाण आलं. मात्र अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना आपण या शिबिरात का सहभाही झालो नाही ते सांगितलं.

आज राष्ट्रवादीचं शिबीर आहे, मात्र या शिबीराला न जाता अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. याबाबत विचारले असता उगच शंका कुशंका काढू नका. माझा पुणे दौरा पूर्वीपासून नियोजित होता असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच पुन्हा एकदा त्यांनी राऊतांवर देखील निशाणा साधला आहे.

काल प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवर देखील यावेळी बोलताना अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अदानी आणि शरद पवार यांची ओळख आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. कोणावर आरोप झाले तर ते राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेतात, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच आपण सरकारच्या कामावर समाधानी नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने