Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; रंगकर्मी नाटक समूह विजयी



ब्युरो टीम: अखिल भारतीय मराठी नाट्य निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी आणि फेरमोजणीनंतर पहाटे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या निवडणुकीत प्रशांत दामले विजयी ठरले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदच्या निवडणुकीचा निकाल मुंबई मध्यवर्ती शाखेतील 10 जागांपैकी 8 जागांवर प्रशांत दामलेंच्या रंगकर्मी नाटक समूहाच्या उमेदवारांचा विजय मिळवला आहे. उर्वरित दोन जागांवर प्रसाद कांबळींच्या आपलं पॅनलचे प्रसाद कांबळी आणि सुकन्या कुलकर्णी-मोने विजयी ठरले आहेत. मुंबई उपनगरात दोन जागा प्रशांत दामलेंच्या पॅनलला मिळाल्या आहेत तर दोन जागा प्रसाद कांबळींकडे गेल्या आहेत.

 

'रंगकर्मी नाटक समूह' पॅनल

 

प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूह या पॅनलमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत. या पॅनलमध्ये विजय केंकरे, अजित भुरे, सयाजी शिंदे, विजय गोखले, वैजयंती आपटे, सुशांत शेलार, सविता मालपेकर यांचा समावेश आहे. प्रशांत दामले यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या रंगकर्मी नाटक समूह या पॅनलची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती.

 

प्रसाद कांबळी यांचं 'आपलं पॅनल'

 

प्रसाद कांबळी यांच्या पॅनलमध्ये सुकन्या मोने, मंगेश कदम, राजन भिसे, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अशोक नारकर, संतोष काणेकर, सुनील देवळेकर, दिगंबर प्रभू, राजन भिसे यांचा समावेश आहे. या पॅनलचं नाव 'आपलं पॅनल' असं आहे

 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे मतदान केंद्र हे माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर आणि गिरगांव येखील साहित्य संघ मंदिर हे होते. रविवारी (16 एप्रिल) सकाळी 9 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान झाले.

 

लॉकडाऊनच्या काळात अनेक नाट्यकर्मींना, नाट्यसंस्थांना मोठा आर्थिक फटका बसला. याच आर्थिक फटक्याला अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेला देखील सामोरे जावे लागले आहे. गेल्या अनेक वर्षांत नाट्यपरिषद आणि वाद हे न संपणारे समीकरण झाले होते. कोरोनाकाळात तर हे प्रकरण आणखीनच गंभीर वळणावर पोहोचले होते. कोरोनाकाळात अचानक टाळेबंदी झाली आणि नाट्यगृहाचा पडदादेखील बंद करण्यात आला होता. तेव्हा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुढे सरसावली होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने