ब्युरो टीम: यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. उषा
मंगेशकर यांनी या पुरस्काराची मंगळवारी घोषणा केली. गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यंदाचे या पुरस्काराचे हे
दुसरे वर्ष आहे.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले
यांना २०२१ या वर्षातील 'महाराष्ट्र भूषण'
हा पुरस्कार जाहीर झाला होता. शुक्रवारी २४
मार्च २०२३ रोजी आशाताईंना हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गेट वे ऑफ इंडिया
येथे एका भव्य कार्यक्रमात प्रदान केला गेला.
दिवंगत मास्टर दीनानाथ
मंगेशकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनानिमित्त नुकतेच एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात
आले. या प्रसिद्धीपत्रकामध्ये या पुरस्काराविषयी माहिती देण्यात आली. यानुसार
यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर
करण्यात आला आहे, तर चित्रपट आणि
नाटक क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेता प्रसाद ओकला विशेष पुरस्काराने सन्मानित
करण्यात येणार आहे. तसेच चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेत्री विद्या बालनला
विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
गेल्या वर्षीपासून,
मंगेशकर कुटुंबीय आणि ट्रस्टकडून भारतरत्न लतादीदींच्या
स्मरणार्थ 'लता दीनानाथ मंगेशकर
पुरस्कार' दिला जातो. हा पुरस्कार
दरवर्षी फक्त एकाच व्यक्तीला दिला जातो. आपल्या राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान देणाऱ्या
व्यक्तीला हा पुरस्कार दिला जाणार आहे. गेल्यावर्षी या पुरस्काराचे मानकरी भारताचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले होते. यावर्षी 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' लतादीदींच्या लहान बहिणीला अर्थात ज्येष्ठ गायिका आशा भोसले
यांना दिला जाणार आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात
येणार आहे. २४ एप्रिलला श्री षण्मुखानंद हॉल, सायन येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि
सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो.
मास्टर दीनानाथ मंगेशकर
पुरस्काराचे मानकरी
विशेष वैयक्तिक पुरस्कार
पंकज उघास (भारतीय संगीत)
सर्वोत्कृष्ट नाटक :
प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनचे गौरी थिएटर्सचे 'नियम व अटी लागू'
श्री सद्गुरू सेवा संघ
ट्रस्ट : (समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवा)
वागविलासिनी पुरस्कार :
ग्रंथाली प्रकाशन (साहित्य क्षेत्रात समर्पित सेवा)
विशेष पुरस्कार : प्रसाद
ओक चित्रपट, नाटक क्षेत्रात समर्पित
सेवा)
विशेष पुरस्कार : विद्या
बालन (चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवा)
टिप्पणी पोस्ट करा