ब्युरो टीम : माफिया आणि राजकारणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आली आहे. पोलीस या दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना तीन अज्ञातांनी या दोघांवर गोळ्या झाडल्या. या दोघांचीही डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. गोळीबार झाला तेव्हा अतिक आणि अशरफ दोघेही जागीच कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. अतिकचे मारेकरी कोण होते, ते तिथे कसे आले? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. तर, दुसरीकडे या हत्येनंतर उत्तर प्रदेशमधल्या योगी आदित्यनाथ सरकारवरच्या बाबत समिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात.
अतिक आणि त्याच्या भावावर गोळीबार झाला तेव्हा माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना काही प्रश्न विचारत होते. दोन्ही भावांनी बोलायला सुरुवात केली तेवढ्यात त्यांच्यावर गोळीबार झाला. काही माध्यमांच्या अहवालात असं म्हटलं आहे की, हल्लेखोर माध्यमांचे प्रतिनिधी बनून तिथे आले होते. हल्लेखोरांनी गळ्यात माध्यमांचं ओळखपत्रदेखील अडकवलं होतं. पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा