Barti:बार्टीच्या विद्यार्थ्यांचे 43 दिवसांपासून आंदोलन; मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची केली बोळवण



ब्यूरो टीम: गेल्या 43 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या बार्टीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांनी भेटून चर्चेची वेळ दिली. मात्र, आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहात पोहोचल्यावर मुख्यमंत्र्यांनी गेटवर निवेदन घेऊन चर्चा न करताच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची बोळवण केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सारथी आणि महाज्योती या संस्थेने 500 विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती दिली. त्याच धर्तीवर, मागासवर्गीयांसाठी असलेल्या बार्टीतील विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती मिळावी, या मागणीसाठी बार्टीचे विद्यार्थी आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठ आणि शहरांमधून आलेल्या 861 विद्यार्थ्यांना बार्टी संस्थेने शिष्यवृत्तीसाठी पात्र केले आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करावी, या मागणीसाठी राज्यभरातून आलेले विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. आज चर्चेसाठी बोलवूनही मुख्यमंत्र्यांनी हा विषय मंत्रिमंडळासमोर ठेवावा लागेल, तुम्ही निवेदन द्या, असे सांगून केवळ निवेदन घेऊन आमची बोळवण केली, अशी माहिती शिष्टमंडळातील विद्यार्थ्यांनी दिली. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने