ब्युरो टीम: जगातील सर्वात
श्रीमंत क्रिकेट मंडळांमध्ये बीसीसीआय पहिल्या स्थानावर आहे.बीसीसीआय भारतीय
क्रिकेटला उच्च स्थानावर नेण्यासाठी नवनवीन बदल करत असलेलं पाहायला मिळतं. यंदा
महिला प्रीमिअर लीग सुरू केली. त्यानंतर आपीएलच्या नियमांमध्ये बदल केले. अशातच
आयपीएल चालू असताना बीसीसीआयकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने आपला
पेटारा उघडला असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये होणाऱ्या स्पर्धांच्या बक्षिसांच्या
रकमेत भरघोस वाढ केली आहे.
देशांतर्गत होणाऱ्या रणजी
ट्रॉफी, इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, देवधर करंडक ट्रॉफी, सय्यद मुश्ताक
अली ट्रॉफी, वरिष्ठ महिला वन डे
ट्रॉफी, वरिष्ठ महिला ट्वेंटी-20 ट्रॉफी या स्पर्धांच्या बक्षिसांमध्ये वाढ
करण्यात आली आहे. याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये
विजेत्याला 1 कोटी आणि उपविजेत्याला 50
लाख, देवधर ट्रॉफीमध्ये विजेत्याला 40 लाख आणि उपविजेत्याला 20 लाख, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विजेत्याला 80
लाख आणि उपविजेत्याला 40 लाख, वरिष्ठ महिला वन
डे ट्रॉफीत विजेत्याला 50 लाख आणि
उपविजेत्याला 25 लाख आणि वरिष्ठ
महिला ट्वेंटी-20 ट्रॉफीमध्ये
विजेत्याला 40 लाख आणि उपविजेत्याला
20 लाख मिळणार आहेत.
रणजीमध्ये आधी विजेत्या
संघाला आधी 2 कोटी आणि उपविजेत्याला 1 कोटी, तर आता विजेत्याला 5 कोटी आणि
उपविजेत्याला 3 कोटी आणि
सेमीफायनल फेरी गाठणाऱ्या संघांना 1 कोटी मिळणार
आहेत. इराणी ट्रॉफीमध्ये विजेत्याला 50 लाख आणि उपविजेत्याला 25 लाख, दुलीप ट्रॉफीमध्ये विजेत्याला 1 कोटी आणि उपविजेत्याला 50 लाख.
टिप्पणी पोस्ट करा