Bhagwangad : दुरावा संपला? धनंजय मुंडे-पंकजा मुंडे- नामदेव शास्त्री एकत्र



विक्रम बनकर,नगर: मागील 7 वर्षांपासून भगवान गडापासून दूर राहिलेल्या पंकजा मुंडे यांनी भगवान गड परिसरातील भारजवाडी येथे हजेरी लावली. भागवान गडाच्या नारळी सप्ताहात पंकजा मुंडे यांनी जोरदार उपस्थित दर्शवली. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचे राजकीय शत्रू आणि भाऊ असलेले धनंजय मुंडे हेदेखील या कार्यक्रमात उपस्थित होते. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून दुरावा निर्माण झाला होता. तो आजच्या कार्यक्रमातून मिटल्याचे दिसून आले. तसेच राजकारणातली लढाई विचारांची आहे. मात्र गडाच्या विकासासाठी आम्ही दोघांनी एकत्र यायचं ठरवलंय, असं मोठं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय.

गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून गडावरून केले जाणार राजकारण हे बीड जिल्ह्याचे सत्ताकेंद्र ठरलेले आहे. लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे हे नगर जिल्ह्यातील भगवानगड येथून दसरा मेळाव्यानिमित्त ऊसतोड मजुरांना संवाद साधायचे. मात्र त्यांच्या निधानानंतर भगवान गडावरील राजकीय मेळावा हा खंडित झाला. महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना राजकीय मेळावा घेण्यास बंदी घातलेली आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांची कन्या भाजप नेत्या पंकजा मुंडे ह्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे भगवान भक्ती गडावर मेळावा घेतात. तर धनंजय मुंडे हे माहूरगड येथे दर्शनाला जातात. मात्र आज सात वर्षानंतर नामदेव शास्त्री, धनंजय मुंडे, आणि पंकजा मुंडे यांच्यात भगवान बाबा भक्तांच्या मुद्द्यावरून दिलजमाई झाल्याचं चित्र दिसून आलं.

आज भगवान गडावरील कार्यक्रमात नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे गेल्या काही वर्षातील दुरावा दूर करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘ मी राजकारण नाही, तुमच्या विरोधातही नाही, असे स्पष्ट सांगितले.  मी भगवान बाबांचे स्वप्न पूर्ण करतोय, हे सर्वांचे कष्टाचे पैसे आहेत. धनंजय मुंडे यांना मी 10 एक्कर जमिनीचा प्रस्ताव दिला. तो त्याने त्वरित मंजूर केला. पंकजा मुंडे यांचं आणि माझं वैर नाही, असं वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केलंय. दोघेही मुंडे घराण्याचे आहे दोघांचं आयुष्य चांगलं आहेत.  मी राजकारणी नाही, साधू संतांचा आदर ठेवा, मागे बोलू नका, दोघांना माझं सांगणं आहे, अशी विनंती नामदेव शास्त्री यांनी केली.

भगवान गडावरील कार्यक्रमात पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘ पंकजा मुंडे जिवंत असेपर्यंत तो पर्यंत भगवान बाबांच्या गादीला धक्का लागणार नाही. मी गोपीनाथ गड स्थापन केला तो महाराजांच्या हस्ते केला. नामदेव शास्त्रींना उद्देशून पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘ तुम्ही शिव्या दिल्या तर आम्ही फुले म्हणून डोक्यावर घेऊ. तुम्ही जोड्याने मारेले तरी चालेल.. तुम्हाला तुमच्या बाजूच्या लोकांनी काही तरी सांगितले दिसते.. मी जोरात बोलले तर अहंकार वाटत असेल, मी एक स्त्री आहे. आम्ही एकत्र येऊ नये यासाठी लोक पाण्यात देव ठेऊन बसलेत. पण मी जर भगवान गडा विषयी बोलले तर मान कापून ठेवीन. माझ्या पर्सनॅलिटीला तुम्ही अहंकार समजू नका. धनंजय आणि माझ्यात काही नाही, तुमच्यात आणि माझ्यात काही वैर होतं हे मला माहित नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय.

तर धनंजय मुंडे म्हणाले, ‘ मी भगवान गडाचा खरा भक्त आहे. माझी हीच ओळख आहे. आज काही गज का होईना ताई माझ्याजवळ आहे. राजकारणात आम्ही किती गज दूर असलो तरी आज जवळ आलो, आमच्यात कौटुंबिक नातं आहे. मला नियतीवर खूप विश्वास आहे, माझ्या सारखा नशीबवान मीच आहे.. ताई म्हणाल्या होत्या मी भगवान गडाची पायरी आहे तर मी त्या पायरीचा दगड आहे. माझ्या सभा मोठ्या होत नाही मी लहान आहे, ताईंच्या सभा मोठ्या होतात.. गडासाठी जी काही जबाबदारी आहेत ती आम्ही दोघे स्वीकारतो, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने