BJP: "जनतेने ठरवलंय ! लोकसभा 2024मध्ये पुन्हा भाजपचेच सरकार येणार" - पीएम नरेंद्र मोदी

 


ब्युरो टीम: जनतेने ठरवले असून 2024 मध्येही देशात भाजपचेच सरकार सत्तेत येणार आहे. भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. मात्र असे असतानाही आत्मसंतुष्ट न होता कार्यकर्त्यांनी जनतेची मने जिंकायची आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

भाजप पक्ष स्थापनादिनानिमित्त दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. दरम्यान, यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी काॅग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, राम्राज्यवादी मानसिकता असलेले लोक गरिबांचा अपमान करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. परंतु 2014 नंतर या सर्व लोकांची अवस्था वाईट झाली आहे. विरोधी पक्षांना घराणेशाही, जातीवाद आणि प्रादेशिक वादाने जखडले आहे. दरम्यान, यावेळी भाजपचे अनेक नेतेमंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने