Bjp: 60 हजार सदस्य नोंदणी करा अन विधानसभेचे तिकीट मिळावा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे .

 


ब्युरो टीम : अहमदनगर जिल्ह्यातील भाजपची संघटनात्मक बांधणी बाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली. कामात सुधारणा करा, नाहीतर पक्षांतर्गत माेठे फेरबदल केले जातील, असा सज्जड दम त्यांनी दिला. नगर शहरात जाे ६० हजार सदस्यांची नाेंदणी करेल, त्यालाच विधानसभेची उमेदवारी दिली जाईल, असंही त्यांनी बजावून सांगितलं.  

नगरमध्ये भाजपच्या काेर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. यावेेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आगामी लाेकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांसाठी बुथ रचना मजबूत करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. 

 अहमदनगर जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने हालचाली हाेताना दिसत नाही. त्यामुळं लवकरात लवकर कामात सुधारणा करा, नाही तर पक्षांतर्गत माेठे फेरबदल करावे लागतील.

 खासदार डॉ. सुजय विखे पाटील, दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंदे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने