ब्युरो टीम: देशातील लोकसभा-राज्यसभा खासदारांच्या संख्येत होणार मोठा बदल होणार आहे. आगामी निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. या बदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

2026 नंतर लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. जनगणने नुसार मतदारसंघांच्या संख्येत वाढ किंवा घट होत असते. त्यामुळे 2026 नंतर मतदारसंघांच्या संख्येत मोठी वाढ होईल. अशी माहिती मिळते आहे.

संपूर्ण देशात लोकसभेचे 800 खासदार असू शकतात. तर राज्यसभेत 332 खासदार असण्याची शक्यता आहे. देशातील एकूण खासदारांची संख्या 1132 होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात जे 48 होते ते आता ही संख्या येणाऱ्या काळात 76 होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात राज्यसभेचे 19 खासदार आहेत. तर ही संख्या 31 होणार असल्याची माहिती मिळते आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने