Cannes Film Festival: 'मदार', 'टेरिटरी' आणि 'या गोष्टीला नाव नाही' हे Marathi चित्रपट कान्स महोत्सवात



ब्युरो टीम: यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजार विभागासाठी  मंगेश बदर दिग्दर्शित 'मदार'  संदीप सावंत दिग्दर्शित 'या गोष्टीला नाव नाही' आणि सचिन मुल्लेमवार दिग्दर्शित 'टेरिटरी'  सिनेमांची निवड झाली आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज जाहीर केले.

 

मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि आंतरराष्ट्रीय दर्शकांनाही मराठी चित्रपटांची भुरळ पडावी या हेतूने राज्य शासनाकडून दरवर्षी कान्स येथे होणाऱया चित्रपट महोत्सवातील बाजार विभागासाठी मराठी चित्रपट पाठविले जातात.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने चित्रपट निवडीसाठी परीक्षण समिती तयार केली होती. एकूण 34 मराठी चित्रपटांचे परीक्षण करण्यात आले होते. त्यातून समितीने या तीन चित्रपटाची निवड केली आहे.

'मदार' या चित्रपटात.दुष्काळग्रस्त खेडय़ात शेतीअभावी, कामाअभावी जीवन रूक्ष झाले आहे. या साऱया रुक्षपणातही या गावात माणसांमधील आपसातील नात्यांचा व माणुसकीचा ओलावा अजूनही शाबीत आहे. हा सिनेमा गंभीर व तीक्ष्ण वास्तववादी मांडणी करतो.

तर 'ह्या गोष्टीला नावच नाही' हा चित्रपट डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या 'मृत्यूस्पर्श' या कादंबरीवर आधारीत आहे. 'टेरिटरी' या चित्रपटात वेगवेगळ्या मानवी स्वभावछटांची व अस्तित्वासाठी लढणाऱया वन्यजिवांची कथा मांडली आहे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने